औरंगाबाद मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या नोंदणीसाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस रंगली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Graduate Election: नांदेड : औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पुढील वर्षी होणार आहे. या निवडणुकीची मतदार नोंदणी करण्यासाठी गुरूवार दि. ६ रोजी शेवटचा दिवस होता, शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणी करत भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उच्चांकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून नेमके किती पदवीधरांची नोंदणी करण्यात आली याची आकडेवारी पुढे आली नसली तरी भाजपने सर्वतोपरी आपली ‘शक्ती’पणाला लावली होती.
ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीत भाजपच आघाडीवर असल्याचे बोलले जात असून भाजपकडे पदवीधरांचा जास्तीचा कल असल्याचे सध्यस्थितीत दिसून आले आहे. पदवीधर मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकाविण्यासाठी रणनीती आखण्यात आली असून नांदेड जिल्ह्यात नोंदणीचा उच्चांक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह भाजपचे पाचही आमदार कामाला लागले आहेत. त्याचबरोब शेकडो प्राधिकारी आळस झटकून नोंदणींच्या कामाला लागले आहेत.
नांदेड महानगरात जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा संकल्प महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचे दिसून आले. दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आपल्या अखत्यारीतील सर्वच तालुक्यांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले आहे. दक्षिणप्रमाणे उत्तरमध्ये भाजपने पदवीधरांच्या नोंदणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या नोंदणीत लक्ष घातले, त्यामुळे भोकर मतदारसंघात भाजप नंबर १ असेल, असे सांगण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपच्या नोंदणीत होईल वाढ ?
भाजप महानगरच्या वतीने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली असून ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी झाली आहे, अंतिम आकडेवारी अजून आली नाही. नांदेड महानगरात पंधरा हजाराहून अधिक पदवीधरांची नोंदणी भाजपने केली असून यात आणखी वाढ होवू शकतेअशी माहिती भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिली आहे.
पदवीधरांच्या नोंदणीसाठी काँग्रेसही यात मागे राहिली नाही, युवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने खासदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आपली यंत्रणा कामाला लावली होती, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेले युवा नेते महेश देशमुख यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या दौरा केला असून मराठवाड्यात काँग्रेसला चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले आहे. शेवटच्या दिवसापर्यंत या दोन प्रमुख पक्षांमध्ये नोंदणीची राजकीय स्पर्धा लागल्याचे पहायला मिळाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तरुणांचा भरभरुन प्रतिसाद
काँग्रेसने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नोंदणी करण्याचे नियोजन होते, त्या अनुषंगाने मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सध्यस्थितीत नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात ५०ते ६० हजार पदवीधरांची नोंदणी झाली आहे, यात आणखी वाढ होईल, अंतिम आकडेवारीचा तपशील आला नाही. पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे सहसमन्वयक महेश देशमुख यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी व महायुतीतील अन्य घटक पक्षांनी फारसा गाजावाजा नोंदणीसाठी केला नसला तरी समाजमाध्यमातून नोंदणीचे आवाहन काही पक्षांनी केले होते. त्याचा कितपत फायदा या पक्षांना झाला, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून नोंदणीच्या अंतिम आकडेवारीचा तपशील अजून जाहीर झाला नाही. त्यामुळे राजकीय पक्षांच्या माध्यमातून करण्यात आलेली नोंदणी प्रशासनाने ‘मान्य’ केली का? हे नंतरच स्पष्ट होणार आहे.
नागपूर येथे सहआयुक्त पदावर विजमान केले आहे.






