मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला जात आहे. त्यात आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा
सनसनी कौन मचाई गा !— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) April 6, 2023
मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटची सर्वत्र एकच चर्चा आहे. त्यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीत…दोघीही एकमेकांचे स्पर्धक आहेत. त्याहून अधिक सनसनाटी कोणी निर्माण केली?’
दरम्यान, अनेकदा ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर भाजप किंवा शिंदे गटाकडून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी अंधारे यांची राखी सावंत हिच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे या टीकेला अंधारे काय प्रत्युत्तर देतात हे येत्या दिवसांत समजेल.