मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना म्हणाले की, ‘रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील त्यातून त्यांना ही टीप मिळाली असेल.माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे. कल्याण लोकसभा भाजपला जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सध्या वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे.
‘भाजपचे मोठे नेते अनुराग ठाकूर या लोकसभा मतदारसंघात बैठका घेतात. त्यामुळे या ठिकाणची उमेदवारी कोणता पक्ष घेईल याबाबत संभ्रम आहे असे सांगितले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ही लोकसभा मतदारसंघात मनसे लढवेल आणि स्वबळावर ही निवडणूक लढवेल, असे देखील सांगितले.