अमेरिकन पासपोर्टवर झळकणार ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने, २८ एप्रिल रोजी ट्रम्प यांच्या निर्णयासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, देशाच्या २५० व्या सेमीक्विन्सेंटेनियल वर्षाच्या स्मरणार्थ लिमिटेड एडिशन पासपोर्ट जारी करण्यात येणार आहे. या पासपोर्टवर आतील पानात राष्ट्राध्यक्षांचा फोटो असेल. इतकेच नाही तर त्यांच्या फोटोखाली त्यांची स्वाक्षरी देखील सोनेरी अक्षरात छापण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे.
सध्याच्या पासपोर्टवर जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन या महान नेत्यांची चित्रे आहेत. आता ट्रम्पही या पंक्तीत स्वत:ला सामील करत आहेत. हा विशेष पासपोर्ट १० वर्षांसाठी अवैध असणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पासपोर्टवर फोटो लावणारे ट्रम्पच पहिले अध्यक्ष ठरणार आहेत.
Ans: अमेरिकेच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष लिमिटेड पासपोर्ट जारी करण्यात आला आहे. यावर ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी असणार आहे.
Ans: ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी असलेला पासपोर्ट ४ जुलै २०२६ पूर्वी मिळणार असून सुरुवातील केवळ २५ ते ३० हजारच छापले जातील. हे पासपोर्ट १० वर्षांसाठी अवैध असणार असून वॉशिंग्टन डीसी येथील कार्यालयात उपलब्ध असतील. यासाठी प्रत्यक्ष अर्ज कारावा लागेल.
Ans: अमेरिकेचा सामान्य पासपोर्ट बंद होणार नाही. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा शहरांमधून अर्ज करु शकता.






