ठाणे शहरात चैत्र नवरात्रोत्सव धूमधडाक्यात! धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचा उपक्रम; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरीत्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने स्वराज्याचे आख्यान, अभंग रिपोस्ट, माता की चौकी यासह अनेक दर्जेदार। सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात असून आले प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बाल गायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर आदी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.(फोटो सौजन्य – pinterest)
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरकडून अत्याधुनिक मोड्युलर आणि हायब्रिड ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन
मंगळवार २४ मार्च रोजी झी टीव्ही आणि स्टार प्रवाह टीव्हीवर गाजत असलेल्या लिटल चैंपस् अर्थात बाल गायक आपल्या जादुयी आवाजाने या उत्सवाला चार चाँद लावणार आहेत. या कार्यक्रमामध्ये शुद्धी कदम, ओमकार कानिटकर, जुई चव्हाण आणि पालकशी दीक्षित हे लोकप्रिय बाल कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवार दिनांक २५ मार्च रोजी रंगीलो रास दांडिया नाईट हा दांडियाचा कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये विजय धुरी, के. पौर्णिमा, हरीश ठक्कर हे लोकप्रिय कलाकार महिला दांडिया नाईटमध्ये रंग भरणार आहेत. आरजे अमित काकडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
संत तुकाराम क्रीडांगण, कोपरी कॉलनी पूर्व याठिकाणी या भव्यदिव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार १८ मार्च रोजी सायंकाळी देवीचे आगमन होणार असून १९ मार्चला गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी १२.१५ वाजता राज्याचे उप मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांचे हस्ते वाजत गाजत देवीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे-जोशी, केतकी चैतन्य यांचा उदे ग अंबे उदे हा देवीचा जागर कार्यक्रम सादर होणार आहे. स्मिता गवाणकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
शुक्रवार २० मार्च रोजी रात्री ७.३० वाजता अविनाश काबाडी, शशांक पाटील, पौर्णिमा काकडे हे नामवंत कलाकार ठाण्याच्या आगरी आणि कोळी परंपरेला उजाळा देणारा आगरी कोळी बाणा हा लोकप्रिय आगरी-कोळी गीत, संगीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार २२ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा स्वराज्याचे आख्यान हा भव्यदिव्य कार्यक्रम सादर होणार आहे.संत परंपरेला उजाळा देणारा आणि मराठीतील लोकप्रिय अभंगांना वेगळ्या थाटाने मांडणारा अभंग रिपोस्ट या गाजलेल्या कार्यक्रमाचे आयोजन सौमवार २३ रोजी करण्यात आले आहे.






