Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी...
Raigad News: जेष्ठांना मिळणार 7 हजार रुपयांचे मानधन; अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेत दिली माहिती
लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे मतदान. त्यामुळे नागरिकांनी प्रथम मतदानाचे कर्तव्य पार पाडून त्यानंतरच विवाहसोहळ्यांकडे वळावे. या संदेशांसह व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे २ डिसेंबर ही तारीख एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मतदान टाळल्यास उमेदवार निवड आणि लोकशाहीच्या भविष्यावर होणारा परिणाम गंभीर ठरू शकतो. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर जबाबदारी आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी ‘प्रथम मतदान, नंतर मंगलकार्य’ असा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक संस्था आणि स्थानिक नेते नागरिकांना आवाहन करीत आहेत की, विवाह सोहळ्याला जाण्यापूर्वी सकाळीच मतदान करून हक्क बजवावा. काहींनी सकाळी ७ वाजता कुटुंब, नातेवाइकांसह मतदान केंद्रावर जाण्याची तयारी केली आहे. मात्र, ज्यांचे विवाह ठरले आहेत, त्यांना पहाटे निघावे लागणार असल्याने काही ठिकाणी मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपरीषद आता निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
स्थानिक लग्न समारंभ मंडळे, हॉल व्यावसायिक आणि भोजन व्यवस्था करणारे सांगतात की, २ डिसेंबर हा हंगामातील सर्वाधिक मागणी असलेला शुभ दिवस आहे. अनेक कुटुंबे विवाहासाठी गावाबाहेर जाणार असल्याने पाहुण्यांची ये-जा, वरात व्यवस्था आणि समारंभातील धांदल यामुळे मतदानासाठी वेळ मिळणे कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो.
जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी ८ महिलांनी एकमेकीविरुद्ध दंड थोपटले आहे. यावेळी नगराध्यक्षपदाची निवड थेट मतदारांतून होत असल्याने पहिल्यांदाच महिलेला संधी मिळणार आहे. यापूर्वी बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात तीनदा नगराध्यक्ष थेट मतदारांतून निवडून आले असून यावेळी चौथ्यांदा मतदारांना थेट नगराध्यक्ष निवड करावी लागणार आहे.
बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा थेट मतदारांतून नगराध्यक्ष निवड प्रक्रिया १ सप्टेंबर १९७८ रोजी पार पाडली होती. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून एम. बाल बैरय्या यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळी थेट मतदारांतून नगराध्यक्षपदाची निवडणूक १७डिसेंबर २००१ मध्ये झाली. यावेळी नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार म्हणून कनकमकुमार येलव्या यांची येथील मतदारांनी केली होती. तिसऱ्यांदा येथे नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट मतदारांतून २८ डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरीश शर्मा निवडून आले होते.






