पिंपरी: ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सन्मान क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या 'देशभक्तीच्या वारशाचा…'
2018 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या सहकार्याने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाचे भूमिपूजन करण्याचा सन्मान लाभला. त्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्याचा हा शुभारंभ… https://t.co/XZtLNPZ25p pic.twitter.com/GPTIfGbxZ2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 18, 2025
https://www.youtube.com/live/CFBz4ic2drw?si=D14ARQKQPOSaEu6s