Photo Credit -Social Media छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार?
Chagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील ओबीसी समाजाचे सर्वात मोठे नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ चांगलेच नाराज असून त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. मंत्रिपमंडळ विस्तारात डावलल्याने भुजबळ चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी उघडपणे आपल्या नेतृत्त्वावरच टिका करत नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भिडून थेट अंगावर घेतलं, पण याचंच बक्षीस आपल्याला मिळाल्याची उद्विग्न प्रतिक्रीया भुजबळांनी दिली. अशातच छगन भुजबळ वेगळा निर्णय़ घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरूवातीला छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर पाठवले जाणार, अशी माहिती महायुतीच्या गोटातून समोर आली. पण भुजबळांनी तीही नाकारली. त्यानंतर आता छगन भुजबळांनी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत. नाशिकमध्ये माध्यमांनी तुमची पुढची भूमिका काय असेल, असा सवाल विचारला असता, ‘जहाँ नही चेंना वहाँ नही …. अशा शायराना अंदाजात भुजबळांनी आपले संकेत दिले आहेत.
Todays Gold Price: सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण; ‘इतक्या’ रुपयांनी कमी झाला भाव
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “आठ दिवसांपुर्वीच मला राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. पण मी ती स्पष्टपणे नाकारली. मी माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकत नाहीत. ती माझ्या मतदारांची प्रतारणा होईल. मी राज्यसभेवर जाणार नाहीत. त्यानंतर माझी आणि अजितदादांशी कुठलीही चर्चा झाली नाही. मी नाशिकमध्ये मतदार आणि समर्थकांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, शिवसेनेत पहिलं बंड करणाऱ्या छगन भुजबळांना 1991 साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शरद पवार यांनी मंत्रिपद दिलं होतं. पण त्याच नागपूरातील हिवाळी अधिवेशनात 33 वर्षांनी शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांचं मंत्रिपद डावललं. त्यामुळे हा अपमान भुजबळांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भुजबळ अजित पवारांची साथ सोडून पुन्हा मशाल हाती घेणार की तुतारी फुंकणार, असी चर्चा सुरू झाली आहे.
300 रुपयांना गिजर तर 200 रुपयांमध्ये हिटर… दिल्लीच्या या मार्केट्समध्ये स्वस्तात करू शकता
दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. अधिवेशनाला हजर न राहता ते पहिल्याच दिवशी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये दाखल झाले होते. नाशिकच्या भुजबळ फार्म आणि त्यांच्या येवला मतदारसंघातील कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेटून त्यांनी संवाद साधला. दुसरीकडे, भुबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थकही चांगलेच आक्रमक झाले होते. ओबीसी संघटना थेट रस्त्यावर उतरल्या, काही ठिकाणी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेलाही जोडे मारण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ काय निर्णय घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.