Pune Crime
चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील रवींद्र विनायक सुर्वे (Ravindra Vinayak Surve) याच्या डोक्यामध्ये[blurb content=””] लोखंडी रॉड मारून अज्ञात इसमाने घरामध्ये त्यांची हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने (Rajendra kumar Rajmane) घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. रवींद्र सुर्वे हा आपली आई आणि भाऊ यांच्यासह राहत होता. त्याला मद्यपानचे व्यसन असल्याने तो सतत घरी भांडण करत असल्याने त्याला कंटाळले होते. त्याच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काल गुरुवारी सकाळी त्याच्या घरी रवी सुर्वे हा मृत अवस्थेत पडला होता.
त्याच्या मृतदेहाच्या शेजारी मोबाईल आणि दारूची बाटली पडलेली दिसून आली. आई आणि भाऊ घरी नसल्याने रात्री त्याने घरामध्ये मटण आहे असे सांगून शेजाऱ्यांच्याकडून दोन भाकऱ्या मागून आणल्या होत्या. त्यामुळे त्याची हत्या रात्रीच झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अलोरे – शिरगावचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचमाना केला. सायंकाळी रत्नागिरीहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ दाखल झाले होते. त्यांनी परिसराची तपासणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने घटनास्थळी रात्री पर्यंत ठाण मांडून होते.