आता गुटखा विक्री कराल तर खबरदार...! राज्य सरकारकडून केली जाणार 'ही' मोठी कारवाई(फोटो सौजन्य - एक्स)
नागपूर : गुटखा, मावा, सिगारेट, सुपारी, पानमसाला व चरस, गांजाची विक्री प्रतिबंधित असून, आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या माध्यमातून ड्रग्ज विक्रीही होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे यासंदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील. तसेच, त्यात अधिक सुधारणा करून अशाप्रकरणी मकोका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून १७ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. नवी मुंबईत ११४४, अहिल्यानगर १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलडाणा ६३४, नागपूर ४९, यवतमाळ १७०६ गुन्हे दाखल करण्यात आले. गुटखा विक्री थांबविण्यासाठी आली. अंमली पदार्थाच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार जिल्हास्तरीय नाकों कोऑर्डिनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समिती अशा समित्या गठीत करण्यात आल्या.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात वश आजूबाजूच्या परिसरात दुकानांमधरे काही खाद्यपदार्थांची मुलांना विक्री होणार नाहीत, या अनुषंगाने नियमित पोलिस विभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली जात आहे. असे असले तरी अशी विक्री सुरूच असल्याने त्यावर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी कमकुवत कायदा अधिक कठोर व कडक करण्यासाठीचे निर्देश कायदा व विधी विभागाला सांगण्यात आले. मकोका लावतानाच त्यांच्यावर एनसीओसी करता येईल. यासोबतच अशा प्रकरणी दर्जेदार पुनर्वसन केंद्र तयार करण्याचेही प्रयत्न आहे. अस्लम शेख, अभिमन्यू पवार, अमिन पटेल व इतरांनीही प्रश्न उपस्थित केले.
भिवंडीत विशेष कारवाई
आमदार रईस शेख यांनी भिवंडीत आजही मोठ्या प्रमाणात गुटखा व ड्रग्जची विक्री होत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेचले, त्यावर भिवंडीत विशेष कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
लोकप्रतिनिधींना माहिती देऊ
गुटखा विक्री थांबविण्यासाठी पथक नियुक्त केल्याची माहिती लोकप्रतिनिधींना दिली नाही. पथकातील सदस्यांची नावे व तक्रार करावयाचा क्रमांक आदीची माहिती व फलक शाळेच्या परिसरात लावावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.






