कोल्हापूर हद्दवाढीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची समंती (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर: गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहराची एक इंच ही हद्द वाढ नसलेल्या शहरा लगतच्या आठ गावांसह हद्दवाढ करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हद्दवाढ होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून शहराची एक इंच सुद्धा हद्द वाढ झालेली नाही. शहराची हद्द वाढ न झाल्याने शहराच्या विकासाला खिळ बसली आहे. हद्दवाढ झाली पाहिजे. हदवाढ करू देणार नाही अशा वेगवेगळ्या भूमिका राजकीय पुढार्यांनी घेतल्याने हद्दवाढीचा प्रश्न लोंबकळ्त पडला होता. शहराच्या हद्दवाढीचा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत.
पहिला हद्दीवाढीचा प्रस्ताव ४२ गावांचा होता. परंतु हद्दी वाढीच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांनी त्याला जोरदार विरोध केला. यामध्ये नेतेही आघाडीवर होते. तसेच गाव बंद ठेवून याला विरोध करण्यात आला होता. ही बाब लक्षात घेऊन सुधारित हद्दी वाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
यामध्ये बावीस गावे वगळून शहरालगतच्या २० गावांचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु या २० गावांचाही हद्द वाढीला विरोध आहे. त्यामुळे आठ गावांचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. शहराला एकरूप झालेल्या आठ गावांची नावे घालून महापालिकेने नवीन प्रस्ताव घ्यावा अशी सूचना करण्यात आले आहे. या नवीन आठ गावांच्या नावासह प्रस्ताव प्रशासकाने द्यावा अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला जाईल मुख्य कार्य अधिकारी संबंधित ग्रामपंचायतींना नोटीसा पाठवून त्यांना ग्रामसभेचा ठराव पाठवायला सांगतील ग्रामपंचायतकडून येणारे ठराव पुन्हा शासना कडे पाठवले जातील त्यानंतर हद्दवाढीला तत्वतः मान्यता मिळेल.
Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड; 35 जण शिंदे सेनेच्या गळाला
कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड
कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेनेने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनात शिंदेंनी कोल्हापुर महापालिका निवडणुकीची जबाबदार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोपवली आहेत. माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामार्फत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक-एक करून गळाला लावण्याचे काम सुरू आहे.