मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे. ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना काढाव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद वाढवून कामे गतीने करावीत. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
महापारेषण कंपनीने सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे १८०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केलेली आहे. यामध्ये सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी महापारेषणकडून होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्रात विकसित पोलाद निर्मितीची चोख परिसंस्था पाहता सध्या चौथ्या क्रमांकावर असलेले राज्य पुढील आठ वर्षांत पोलाद निर्मितीत देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. यात अधिकाधिक वाटा हा हरित पोलादाचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरेगांवस्थित नेस्को संकुलात ‘स्टीलेक्स २०२५ – स्टील महाकुंभ’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात पोलाद क्षेत्रातील आघाडीच्या नऊ कंपन्यांकडून प्रस्तावित ८०,९६२ कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील या प्रस्तावित प्रकल्पांतून ९०,३०० लोकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अक्षय्य व अपारंपरिक ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, यूएनडीपीच्या भारतातील प्रतिनिधी डॉ. अँजेला लुसिगी, ‘आयफा’चे पदाधिकारी, आघाडीचे उद्योग प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.