कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) मध्ये सहभागी झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे (Ajit Pawar oath as DCM).
अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं असताना दुसरीकडे या राजकारणावर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी चर्चा मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे (Both Uddhav Thackeray and Raj Thackeray should come together to overcome this politics). पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे.
[read_also content=”मेड-इन-इंडिया Harley-Davidson X440 झाली भारतात लाँच किंमत ₹2.29 लाखांपासून सुरू https://www.navarashtra.com/web-stories/harley-davidson-x440-made-in-india-launch-starting-229-lakh-nrvb/”]
या आशयाचे बॅनर देखील काही शहरात झळकले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कल्याण मध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांकडून आवाहन करत केडीएमसी मुख्यालयासमोर बॅनर लावण्यात आलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या….हीच ती योग्य वेळ, महाराष्ट्राला राजकारण नको ,तर महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही एकत्र यावे फक्त, महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा असा मजकूर या फलकावर आहे.या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे ,उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत.
[read_also content=”Ajit Agarkar ने कट्टर विरोध असूनही फातिमाशीच केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी https://www.navarashtra.com/web-stories/ajit-agarkar-got-married-to-fatima-in-spite-of-strong-opposition-know-the-unique-love-story-nrvb/”]
या बॅनरच्या माध्यमातून आर्त हाक देण्यात आली आहे. मनसेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांनी हे बॅनर लावले आहेत. भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते तशी कुजबुज करू लागले आहेत. ही कुजबूज आता बॅनरच्या माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आता दोन्ही नेते काय निर्णय घेतात ? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
[read_also content=”जेव्हा आनंद महिंद्रा यांना वाटत होती याची भीती, ‘या’ कारने फळफळलं नशीब https://www.navarashtra.com/web-stories/when-anand-mahindra-feared-that-his-job-fired-if-scorpio-flopped-but-this-car-luck-paid-off-nrvb/”]