नाना पटोले यांचे ठाकरे बंधूंवर भाष्य (फोटो-सोशल मीडिया)
नाना पटोले यांचा राज्य सरकारवर घणाघात
बिहारमधील एसआयआरवर केले भाष्य
ठाकरे बंधु एकत्रित येण्यावर दिली प्रतिक्रिया
Congress Leader Nana Patole: कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळआय त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक, एसआयआर, मीनाताई ठाकरे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर भाष्य केले आहे. यावेळआय त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. निवडणुका या पारदर्शकपणे व्हाव्यात असे त्यांनी म्हटले आहे.
कोंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, “मत चोरी सुरू आहे. निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत. यासाठी लोकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणस मेलेली दाखवतात, हे सुप्रीम कोर्टासमोर आले आहे. हा तर मोदींचा फंडा आहे. नाव दुरुस्त झाली पाहिजे. आम्हाला मत चोरीची भीती वाटत आहे.”
ठाकरे बंधु एकत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “त्यांचे मनोमिलन होत आहे. त्यावर काही बोलण्याची गरज नाही. महाविकास आघाडीत ते असणार की नसणार यावर आता बोलणे योग्य नाही. हायकमांड त्यावर निर्णय घेईल. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेचा निषेध करतो. हे राज्य सरकारचे अपयश आहे.
बेरोजगारांसाठी खुशखबर! निवडणुकीआधी ‘या’ सरकारची नवी खेळी, युवकांना दरमहा 1000 रूपये अन्…
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर देखील नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. नाना पटोले म्हणाले, “त्यांनी काय बोलावे हा त्यांचा विषय आहे. राऊत यांनी स्वतःची भूमिका मांडली की पक्षाची हे माहिती नाही. जनता काय ठरवते हे आपण पाहू. आम्हालाही वाटते की आमच्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा.”
ठाकरे बंधूंची युती काय देतीये संकेत?
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील युतीमुळे कोणतेही राजकीय नुकसान होणार नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत असले तरी, काँग्रेसला पुढे जाण्याची आणि प्रगती करण्याची संधी पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) भार वाहून नेण्याऐवजी, काँग्रेसला त्याशिवाय पुढे जाणे सोयीचे होईल. असे असूनही, उद्धव यांचा प्रयत्न असा असेल की काँग्रेस आणि मनसे दोघेही त्यांना पाठिंबा देतील. त्यांचा हा विचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आहे.
ठाकरे बंधूंची युती काय देतीयेत संकेत; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपूर्वी दूर झाले मतभेद
राज्यात प्रथम जिल्हा पंचायत समिती, नंतर महानगरपालिका निवडणुका आणि नंतर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही या महाआघाडीचा भाग असेल. महानगरपालिका निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची अपेक्षा आहे. आता प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) उद्धव सेना आणि मनसे यांच्यातील युतीत सामील होतील की त्यांना स्वतंत्रपणे त्यांची ताकद आजमावायची आहे? एक काळ असा होता जेव्हा उद्धव आणि राज एकमेकांचा चेहरा पाहण्यास तयार नव्हते.