मंत्री नितेश राणे आक्रमक (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदास असलेला विशाळगडावर गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशाळगडावरील ही संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जारी केला आहे. दरम्यान 12 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी किल्ले विशाळगडावर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावरून मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
किल्ले विशाळगडावर 12 जानेवारी रोजी उरूस आयोजित करण्यात आला आहे. यावरून मंत्री नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान यावरून मंत्री निटेश राणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नितेश राणे आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळेस बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “किल्ले विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचे काम कोणी करू नये. 12 तारखेला किल्ल्यावर उरूस भरवला जाणार असल्याचे समजते आहे. विशाळगडावरील कायदा व सुव्यवस्था कोणीही खराब करू नये. शासन व सरकार म्हणून आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत. ”
विशाळगड तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदास असलेला विशाळगडावर गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशाळगडावरील ही संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे. याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जारी केला आहे. मात्र काही अटी आणि शर्तींचे पालन केलं तरचं पर्यटकांना किल्ले विशाळगडावर जाता येणार आहे.
हेही वाचा: Vishalgad Curfew : शिवरायांचा हा किल्ला तब्बल सहा महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला; तहीही या असणार अटी
विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाविरोधात गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींनी आवाज उठवला होता. यानंतर विशाळगड मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाला गजापूर गावात हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.
हेही वाचा: विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा तापला; संभाजीराजे छत्रपती गडाच्या दिशेने रवाना
गडावरील जरी बंदी उठवण्यात आली तरी पर्यटकांना नियम आणि अटींचं पालून करावं लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे. दरम्यान विशाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
विशाळगड जिल्हा प्रशासनाने 31 जानेवारीपर्यंत पर्यटकांना आणि देवदर्शनासाठी खुला करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र गडावर पर्यटकांना दहा ते पाच या वेळेतच सोडले जाणार आहे. कोणत्याही नागरिकांना सायंकाळी पाचनंतर गडावर मुक्काम करता येणार नाही. तसंच किल्ल्यावरील धार्मिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान किल्ले विशागडावर कोणालाही मासांहार पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत किंवा शिजवून खाता येणार नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.