मयुर फडके, मुंबई : दापोली (Dapoli) येथील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) व्यावसायिक भागीदार आणि सहकारी सदानंद कदमांना (Sadanand Kadam) अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab UBT) यांनी अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी सोमवारी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे.
ईडीने दाखल केलेली तक्रार रद्द (Complaint Cancel) करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली असून याचिका प्रलंबित असेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून रोखण्याची मागणीही केली आहे. परब यांच्या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
[read_also content=”रेल्वेसाठी अन् भारतीयांसाठीही अभिमानाचा क्षण : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी केले सोलापूर ते सीएसएमटी Vande Bharat Express चे सारथ्य https://www.navarashtra.com/maharashtra/a-proud-moment-for-railways-indians-too-asia-first-woman-loco-pilot-surekha-yadav-piloted-vande-bharat-express-from-solapur-to-csmt-nrvb-375888.html”]
ईडीने केलेल्या दाव्यानुसार, २०११ मध्ये पुण्यातील विभास साठे यांनी दापोली येथे शेतजमीन खरेदी केली त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी ही जागा परब यांना १.८० कोटी रुपयांना विकली. त्याबाबतचा करार २०१९ मध्ये केला.
या रकमेपैकी ८० लाख रुपयांची रोख रक्कम परब यांनी कदम यांच्यामार्फत साठे यांना दिली. या जागेवर परब यांनी साई रिसॉर्ट बांधून ते नंतर कदमांना विकले. ही जागा शेतीसाठी आरक्षित होती त्यामुळे आरक्षण बदलण्यासाठी परब आणि कदम यांनी साठे यांना महसूल विभागात अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर कदम यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून १२ सप्टेंबर २०१७ रोजी जागेचे बेकायदेशीररीच्या आरक्षण बदलून घेतले.
[read_also content=”पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या; MNS आमदार राजू पाटील यांनी KDMC आयुक्तांना घातले साकडे https://www.navarashtra.com/maharashtra/withdraw-the-forfeiture-notices-issued-to-25000-flat-holders-in-palava-mns-mla-raju-patil-sued-the-kdmc-commissioner-nrvb-375875.html”]
याशिवाय, कदम यांनी परब यांच्या संगनमताने आणि पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधले आहे. रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामामुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा दावा ईडीने केला आहे.