Photo Credit- Social media
मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांना खडसावलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकासाठी किरीट सोमय़्या यांची निवड़णूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. पण आपल्याला न विचारता ही नियुक्ती केल्याने त्यांनी ही उघड नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळए आणि रावसाहेब दानवे यांना पत्र लिहीत सुनावले आहे.
निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा मला न विचारता करण्यात आली, ही पद्धत चुकीची असून ती मला अमान्य आहे, असेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.इतकेच नव्हे तर मी आपल्या समितीचा सदस्य नाही,पुन्हा अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: शाळेतीलच एका खोलीला लागली अचानक आग; पोषण आहार शिजवण्याचे सुरु होते काम
प्रिय बावनकुळे जी
“मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच (5 1/2) वर्ष, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करीत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. 3 वेळा माझा वर जीवघेणे हल्ले ही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.”
किरीट सोमय्या 2014 साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. पण 2019 साली त्यांनी शिवसेनेला केलेल्या विरोधामुळे भाजपने त्यांना खासदारकीचे तिकीट दिले नाही.पण उद्धव ठारकेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सोमय्या पुन्हा चर्चेत आले.
हेही वाचा: घरच्या घरी हॉटेलसारखे पनीर कटलेट बनवायचे तरी कसे? जाणून घ्या
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्वांवर नंतर कारवाईदेखील झाली. यात खासदार संजय राऊत, अनिल परब, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे अशा अनेकांचा समावेश होता. पक्षासाठी त्यांनी केलेले काम पाहता त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. पण क्षाजपने मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिल्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा होती.पण विधानसभा निवडणुकाच जवळ आल्याने पक्षानेत्यांच्याकडे निवडणूक आयोग संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. पण त्यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या अद्यापही नाराज असल्याचे बोलले जात आहे.