मुंबई : अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेला आजपासून सुरुवात होणार आहे. सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief) योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरणाला आजपासून सुरुवात होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठक सभागृह, मंत्रालय येथे दुपारी ०२.३० वाजता होणार आहे. सन २०१७ – १८, २०१८ – १९ व २०१९ – २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. आजच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते.
योजनेसाठी काय आहेत निकष?






