जगातील सर्वात आलिशान आणि नामांकित कार ब्रँड्सपैकी एक असलेल्या Rolls-Royce Cars च्या कारच्या बोनटवर दिसणारी पंख पसरल्या सारख्या स्त्रीची मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेते. या प्रसिद्ध प्रतीकाला “Spirit of Ecstasy” असे म्हणतात. ही केवळ एक शोभेची मूर्ती नसून तिच्यामागे प्रेमकथा, कला आणि इतिहासाची एक अनोखी कहाणी दडलेली आहे.
प्रेमकथेतून जन्मलेले प्रतिक
१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला ब्रिटीश व्यक्ती जॉन वाल्टर एडवर्ड स्कॉट मॉन्टॅग्यू यांना त्यांच्या कारसाठी एक खास प्रतिक किंवा लोगो तयार करून घ्यायचा होता.त्यासाठी त्यांनी चार्ल्स रॉबिन्सन सायक्स यांची मदत घेतली. सायक्स यांनी तयार केलेल्या मूर्तीसाठी त्यांना जी प्रेरणा मिळाली ती मॉन्टॅग्यू यांच्या सेक्रेटरी आणि कथित प्रेमिका एलनोर वेलस्को यांच्याकडून. सुरुवातीला या मूर्तीचे नाव The Whisper असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याच संकल्पनेतून “Spirit of Ecstasy” ची या प्रतीकाची निर्मिती झाली.
‘या’ व्यक्तीने एकाच दिवशी खरेदी केली 3 Rolls–Royce – Navarashtra
१९११ मध्ये अधिकृत पदार्पण
1911 साली रोल्स-रॉईस यांनी या मूर्तीला आपल्या वाहनांचे अधिकृत प्रतीक म्हणून स्वीकारले. मूर्तीतील स्त्री पुढे झेपावत असल्यासारखी दिसते. तिचे वस्त्र वाऱ्यात उडत असल्याचा भास होतो. हे दृश्य वेग, सौंदर्य, स्वातंत्र्य आणि अभिजातता यांचे प्रतीक मानले जाते. या प्रतीकाने रोल्स-रॉईस आपल्या दर्जाची आणि प्रमाणाची साक्ष देते.
काळानुसार बदल
गेल्या शंभर वर्षाच्या काळात या मूर्तीच्या आकारात आणि साहित्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला ही मूर्ती चांदी किंवा धातूपासून बनवली जात होती. आज काही विशेष मॉडेल्समध्ये ती स्टेनलेस स्टील, क्रिस्टल किंवा सोन्याच्या फिनिशमध्येही उपलब्ध आहे. आधुनिक रोल्स-रॉईस कारमध्ये ही मूर्ती कोणी स्पर्श केल्यास बोनटमध्ये आपोआप आत सरकते, ज्यामुळे चोरी किंवा नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
भारतात Rolls Royce च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती?
केवळ लोगो नाही, तर एक ओळख
जगभरात अनेक कार कंपन्यांचे लोगो प्रसिद्ध आहेत, पण “Spirit of Ecstasy” ही एकमेव अशी ओळख आहे जी कारच्या बोनटवर त्रिमितीय शिल्पाच्या स्वरूपात दिसते. त्यामुळे ती केवळ लोगो नसून रोल्स-रॉईसच्या वैभवशाली परंपरेचे आणि कारागिरीचे जिवंत प्रतीक बनली आहे. आजही “Spirit of Ecstasy” चा लोगो कम मूर्ती पाहताच लोकांच्या मनात लक्झरी, प्रतिष्ठा आणि रोल्स-रॉईसची अद्वितीय ओळख जागी होते.






