फेरीवाल्यांमुळे डोंबिवली स्टेशन परिसरात अडकली रुग्णवाहिका, मनसे नेत्याच्या ट्वीटमुळे एकच खळबळ (फोटो सौजन्य-X)
डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्याने वाहतूक कोंडी होती. त्याचा नाहक त्रास नागरीकांना भोगावा लागतो. मनसे नेते राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांनी रस्ता व्यापला आहे. त्यात एक रुग्णवाहिका अडकली आहे. या ट्वीटच्या माध्यमातून फेरीवाला प्रश्न सत्ताधारी सोडवू शकले नाही. त्याचा त्रास नागरीकांसह रुग्णवाहिकांनाही सहन करावा लागत आहे.
आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला… pic.twitter.com/NxaFlEatFs — Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 13, 2025
आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ?






