भिडे गुरुजींनी घेतली फडणवीसांची भेट (फोटो- टीम नवराष्ट्र)
संभाजी भिडे गुरुजींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पुण्यात पार पडली भाजपची बैठक
गडकोट मोहिमेचे निमंत्रण देण्यासाठी भेट झाल्याची शक्यता
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान भाजपने देखील कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यातच पुण्यातील दौऱ्यात भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे.
पुण्यात भाजपची विभागवार बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य मंत्री आणि संघटनेतील महत्वाचे अधिकारी, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
🕕 6.13pm | 11-10-2025📍Pune. LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/DsdPaQBDJh — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भिडे गुरुजी यांच्यात काय बैठक झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भिडे गुरुजी हे मला मोहिमेचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. ही मोहीम डिसेंबर महिन्यात होणार आहे, त्याचे त्यांनी मला निमंत्रण दिले. डिसेंबरमध्ये निवडणुकीचे नियोजन पाहून शक्य झाल्यास मी येईन असे त्यांनी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुण्यात भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बॉइथक पार पडली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य नेते उपस्थित होते. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांबाबत भाजपचा मोठा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महायुतीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. त्यासंदर्भातील सर्व अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. पण त्याचवेळी या निर्णयामुळे महायुतीतील मित्रपक्षांना कोणताही त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.