कल्याण : कल्याण पश्चिम परीसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले सॅटिसचे काम ढिसाळ नियोजनाच्या अभावामुळे संथगतीने सुरु आहे. स्मार्ट सिटी, कल्याण डोंबिवली महापालिका, रेल्वे, वाहतुक पोलिस, पोलिस प्रशासन, आरटीओ यांचा समन्यव्य नाही परिणामता: स्टेशन परिसरात व प्रमुख चौकात नित्यरोज प्रंचड वाहतुक कोडी व वाहतुक व्यवस्थेचा संपुर्ण बोजवारा उडालेला आहे.
सॅटिसचे काम सुरु असताना वाहतुक पोलिसांनी परिपञक जारी करुन वाहतुक व्यवस्थेत बदल केले पंरतु प्रत्यक्ष अमलबजावणी होत नाही उपाययोजना अभावी संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. सॅटिसचे काम सुरु असताना एसटी महामंडळाचा बस डेपो विठ्ठलवाडी येथे स्थालांतरीत केला पंरतु एसटी महामंडळाच्या बसेस रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्थानक व सॅटिस काम पुर्ण होईपंर्यत प्रेम आँटो, दुर्गाडी चौक, एपीएमसी मार्केट बायबास मार्गे व शहराच्या बाहेरच तात्पुरते बसथांबे आवश्यक होते.
बसडेपो विठ्ठलवाडी येथे स्थालांतरीत करुनही बाहेर गावच्या सर्वच बसेस एकेरी स्टेशन परिसरात येतात त्यामुळे एकेरी वाहतुक मार्गावर प्रचंड ताण येऊन प्रचंड वाहतुक कोडीं होत आहे. सॅटिसचे काम सुरु आहे त्या परिसरात व दिपक हॉटेल ते शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, साधना हॉटेल, भानुसागर रोड बैलबाजार ह्या वाहतुकीच्या भर रस्त्यावर खाद्यपदार्थ हाथगाडी ठेले पथारी वस्तु विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे यामुळे रहदारीस अडथळे येत आहे.
एसटी स्टॅण्ड समोरील कल्याण पश्चिम ते कल्याण पुर्व लाखो प्रवासी वाहतुक असलेला रेल्वे हद्दीतील तीस वर्ष जुना रिक्षा स्टॅण्ड कोरोना काळात रेल्वेने तडकाफडकी कायमस्वरुपी बंद केला. रेल्वेने व महापालिकेने पर्यायी जागा रिक्षा स्टॅण्ड व्यवस्था केली नाही परिणामता: सर्व रिक्षा वाहतुक एसटी स्टॅण्ड समोरील रस्त्यावर आली.
काही महिन्यांपुर्वी एसटी स्टॅण्ड समोरील रहदारीचा रस्ता सॅटिस कामाकरीता बंद केला. तेथील सर्व रिक्षा वाहतुक साधना हॉटेल येथील अंत्यत वर्दळीच्या रस्तयावर आली. रस्ता बंद करायच्या आधी रिक्षा संघटनेने पर्यायी रिक्षा वाहतुक स्टॅण्ड करीता दोन तीन ठिकाणी रेल्वे व महापालिका हद्दीत जागा सुचवुन रिक्षांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती पंरतु रेल्वे व महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले.
कल्याण डोबिंवली महापालिका आयुक्तांनी स्टेशन परिसरात पाहणी करुन स्मार्ट सिटी, रेल्वे महापालिका, आरटीओ, वाहतुक पोलिस, पोलिस प्रशासन यांची संयुक्तिक बैठक आयोजन करुन स्टेशन परिसरात संथगतीने सुरु असलेल्या सॅटिस कामाची गती वाढवावी रिक्षा वाहतुक व वाहतुकीचे नियोजन करावे. वाहतुक कोडीं व स्टेशन परिसरातील बेशिस्त वाहतुक तक्रारी याबाबत लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष उदासिन आहे. यामुळे प्रवाशी नागरीकांच्या नाराजीचा फटका आगामी लोकसभा व विधान सभा महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना सहन करावा लागेल अशी चर्चा रंगली आहे.