8 सप्टेंबरलाही शाळा, कॉलेज, ऑफीस राहणार बंद, काय आहे सरकारचा निर्णय? (फोटो सौजन्य-X)
Eid E Milad 2025 Holiday News in Marathi : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारने ईद-ए-मिलादसाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बदल केला आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात बंधुता आणि एकता टिकावी या हेतूने मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलाद निमित्त काढला जाणारा जुलूस कार्यक्रम ६ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
शनिवार दि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे, मुंबई शहर आणि उपनगरातील सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये सोमवारी बंद राहतील. मूळ अधिसूचनेनुसार, ईद-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार, ५ सप्टेंबर होती. दरम्यान, मुस्लिम संघटनेने २१ ऑगस्ट २०२५ रोजी बैठक घेऊन सोमवार, ८ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. ६ सप्टेंबर रोजी रोजी अनंत चतुर्दशी असल्याने संभाव्य गर्दी टाळणे आणि शांतता राखणे हा यामागील उद्देश होता.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांपैकी, ईद-ए-मिलादची सुट्टी ५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केली आहे. यानिमित्ताने मिरवणुका काढल्या जातात. अनंत चतुर्दशी ईदच्या दुसऱ्या दिवशी असल्याने प्रशासनावर खूप ताण असतो. विशेषतः पोलिसांवर खूप ताण असतो. हे लक्षात घेऊन मुस्लिम संघटनेने विसर्जनानंतर मिरवणूक काढण्याचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम संघटनेने सोमवारी ईदची सुट्टी देण्याची मागणी केली होती. ही विनंती लक्षात घेऊन सरकारने ईद-ए-मिलादची सोमवारी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
या निर्णयाचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होईल. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्टी (शनिवार, रविवार, सोमवार) मिळेल. या सुट्ट्यांमुळे अनेक लोक बाहेर जाण्याचा किंवा गावी जाण्याचा विचार करत आहेत. सरकारने मसुद्याच्या अधिसूचनेत म्हटले आहे की ८ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरीय जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५ ही सार्वजनिक सुट्टीची तारीख म्हणून कायम ठेवण्यात आली आहे.