'या' कारणामुळे एकनाथ शिंदे यांचं विमान उड्डाण करण्यास पायलटचा नकार
एकनाथ शिंदे नुकतेच मुक्ताईनगरमधील आपल्या दौरा संपवून जळगाव विमानतळावर दाखल झाले होते. इथून पुढे त्यांना मुंबईकडे रवाना व्हायचे होते. मात्र, विमानाच्या पायलटने विमान उडवण्यास नकार दिला. यामुळे शिंदेंना मुंबईकडे रवाना होण्यास विलंब होत होता. मात्र, आता विमान मुंबईकडे रवाना झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विमानातील पायलट सलग 12 तास ड्युटीवर होता, त्यामुळे थकव्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. याच कारणास्तव पायलटने विमान उडवण्यास नकार दिला, आणि त्यामुळे उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान, वैमानिकाने विमान उड्डाणास नकार दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी आणि विमान प्राधिकरणाचे अधिकारी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.मात्र, आता विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.