Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक
फ्री फायर मॅक्समध्ये OB52 अपडेटनंतर रोझी डिझायर बंडलची एंट्री झाली आहे. या बंडलची किंमत गेममध्ये 1,199 डायमंड्स आहे. या बंडलमध्ये प्लेअर्सना रोझी डिझायर टॉप, रोझी डिझायर बॉटम, रोझी डिझायर शूज, रोझी डिझायर मास्क आणि रोझी डिझायर हेड इत्यादी मिळणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्समधील महिला प्लेअर असाल तर या बंडलसह तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला एक नवीन लूक देऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये नव्या अपडेटसह फॉक्सलाइट फँटम बंडलची एंट्री देखील झाली आहे. या बंडलची किंमत गेममध्ये 1,499 डायमंड्स आहे. या बंडलमध्ये प्लेअर्सना फॉक्सलाईट फँटम टॉप, फॉक्सलाईट फँटम बॉटम, फॉक्सलाईट फँटम शूज, फॉक्सलाईट फँटम मास्क आणि फॉक्सलाईट फँटम हेड इत्यादी मिळणार आहे. या बंडलसह तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला नवीन लुक देऊ शकता.
थॉर्नी डिझायर बंडलची किंमत 1199 डायमंड्स आहे. हा बंडल देखील नव्या अपडेटसह गेममध्ये आला आहे. या बंडलमध्ये प्लेयर्सना थॉर्नी डिझायर टॉप, थॉर्नी डिझायर बॉटम, थॉर्नी डिझायर शूज, थॉर्नी डिझायर हेड इत्यादी मिळणार आहे. या बंडलसह तुम्ही तुमच्या करेक्टरला डॅशिंग लुक देऊ शकता.






