मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. आजच्या मविआच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी दांडी मारल्यामुळं शंकेची पाल चुकचुकली असून, मविआचे टेन्शन वाढले आहे.
[read_also content=”अबब ! वरंवडी शिवारात आढळला तब्बल ९ फुटी अजस्त्र अजगर https://www.navarashtra.com/maharashtra/huge-python-found-in-sangamner-ahmednagar-nrka-298475.html”]
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार, त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी पार पडणार आहे. बंडखोर आमदारांनी मविआचा पाठिंबा काढल्याचेही पत्रक दिले होते. त्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. यावर सेनेनं न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. तसेच मुंबईत आल्यानंतर ते सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. गुवाहाटीला असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारही उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. त्यामुळे बंडाळी आमदार उद्या मुंबईत आल्यावर एकनाथ शिंदेसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.