अकलूज : ४३ माढा मतदार संघामधील २५४ अ.जा. माळशिरस तालुक्यामध्ये आज अत्यंत चुरशीने पण शांततेत मतदान प्रकिया पार पडली. सकाळी ८ वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका वाढला असला तरी नागरिक उत्स्युर्तपणे मतदानासाठी बुथवर येत होते.
सकाळी साडे आठच्या सुमारास शंकरनगर येथील मोहितेवस्ती मतदान केंद्रावरती माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांनी मतदान केले. त्यापाठोपाठ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी, राजसिंह, उर्मिलादेवी, सत्यशील, देवीश्रीदेवी, उर्वशीराजे, पद्मजादेवी व मोहिते-पाटील परिवारातील इतर सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अकलूज येथील दत्त चौकामध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कन्या इशिता यांनी मातोश्री शितलदेवी यांच्या समवेत पहिल्यांदाच मतदान केले. याच मतदान केंद्रावरती जयसिंह, रणजितसिंह, सत्यप्रभादेवी, विश्वतेजसिंह, संग्रामसिंह, ऋतुजादेवी यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवून लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावी असा संदेश दिला. मतदानानंतर अकलूज शहरात फेर फ़टका मारताना धैर्यशील मोहिते-पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भेट झाली असता दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.
सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात होण्यापुर्वीच मतदान केंद्राच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. शिस्तीत आणि शांततेत मतदान सुरू असताना उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अकलूजसह माळशिरसत लगुक्यातील मतदाना केंद्रांना भेटी दिल्या. माळशिरस तालुक्यातील ३ लाख ३७ हजार ३८६ मतदारांपैकी सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत पुरुष ८३ हजार ३२९, खीया ६४ हजार ३०६ व इतर ९ असे एकूण १ लाख ४७ हजार ६४४ लोकांनी मतदान केले. याची एकूण टक्केवारी ४३.७६ टक्के इतकी भरली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत माळशिरस तालुक्यातील एकूण मतदार पुरूष १ लाख ४ हजार १९०, स्त्रीया ८४ हजार ८३९ व इतर १४ असे एकूण १ लाख ८९ हजार ०४३ असे ५६.०३ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत माढा मतदार संघामधील एकूण मतदार १९ लाख ९१ हजार ४५४ त्यापैकी पुरूष ५ लाख ४९ हजार ९६७, स्त्रीया ४ लाख ४८ हजार ८६९ व २३ असे एकूण ९ लाख ९८ हजार ८५९ मतदारांनी मतदान केले. त्याची एकूण टक्केवारी ५०.१६ इतकी आहे.
खळवे, ता. माळशिरस येथे मतदान यंत्र अत्यंत संथ गतीने चालत असल्याने साडेपाच वाजता सुमारे ३०० ते ४०० लोक ताटकळत उभे होते. तक्रार करूनही दुसरे मतदान यंत्र वेळेत पोहोचवले गेले नाही.
Web Title: Evening in malshiras taluka 56 03 percent voting till 5 and 50 16 percent voting in madha constituency political news nrpm