सोलापूर : उत्सवाचे माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुध्द राहते. मन प्रसन्न ठेवा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राजीव गांधी प्रशासकीय (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२२ या अभियानाचा शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता दिपक कोळी प्रमुख उपस्थित होते.
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, गणपतींचे पौराणिक वेगळे महत्व आहे. गुरू आपल्या जिवनात महत्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वरी आपण समजून घ्या. आपल्या सारखे हुशार कोणी नाही ही भावना काढून टाकायला पाहिजे. विज्ञान युगात आपण वावरतो.
आपण वाचतो परंतू समजून घेत नाही. कुराण, बायबल व गीता वाचून पहा. अध्यात्माचे ज्ञान जवळपास सारखे आहे. कोरोनाने आपल्याला जागा दाखवून दिली. स्वच्छता महत्वाची आहे. बाहेरून आलेनंतर आपण हातपाय स्वच्छ धुतो. टाळ्या वाजविलेनंतर आपले पन्नास टक्के व्हायरस निघून जातात. धुप का लावायचा याचे शास्त्रीय कारण समजून घ्या. प्रत्येक सणामागे विज्ञान दडले आहे.
चैत्र महिन्याचे पहिल्या दिवशी कडूनिंबाचा पाला खातो. सण साजरे केले पाहिजेत. संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. गणपतीचा कान सुपाएवढा आहे. याचा अर्थ आपण एकले पाहिजे. एकलेशिवाय आपण खरा श्रोता होऊ शकणार नाही. उत्सवाचे माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुध्द राहते. मनाला हजार डोळे असतात. मन प्रसन्न ठेवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन उपस्थित होते. सुत्रसंचालन दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे अधिक्षक विवेक लिंगराज यांनी केले. आभार मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांनी मानले.
[read_also content=”हेमा मालिनींच्या ‘यशोदा कृष्ण बॅले’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध ! https://www.navarashtra.com/maharashtra/hema-malinis-yashoda-krishna-ballet-enchanted-the-audience-nrdm-322733.html”]
पर्यावरण पुरक उत्सव साजरे करा- कुलकर्णी
पर्यावरण पुरक उत्सव साजरे करा. गणेशोत्सव मुळे राष्ट्रीय एकात्मता जोपासली आहे. नकारात्मक विचार सोडून द्या. नेहमी सकारात्मक रहा. असे आवाहन कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे एकोपा वाढतो. गणेशोत्सव सामयीक असला पाहिजे. सर्वाचा या मघ्ये सहभाग असतो. पर्यावरण पुरक उत्सव साजरे करा. जेणे करून पर्यावरणाची हानी होणार नाही.