मयुर फडके, मुंबई : भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपाप्रकरणी कारागृहातून सुटका झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former State Home Minister Anil Deshmukh) यांना विशेष पीएमएलए (Special PMLA) आणि सीबीआय न्यायालयाने (CBI Court) गुरुवारी १८ मार्च ते २६ एप्रिल दरम्यान त्यांचे मूळ गाव नागपूर (Native Place, Nagpur) तसेच नवी दिल्ली (New Delhi) येथे जाण्याची परवानगी दिली. तसेच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने (पीएमएलए) देशमुखांना शहर सोडण्यापूर्वी एक लाख रुपयांची हमी जमा करण्याचे निर्देश दिले (Before leaving the city he was directed to deposit a guarantee of one lakh rupees).
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची २७ डिसेंबर २०२२ रोजी तब्बल १३ महिन्यांनी उच्च न्यायालयाने १ लाखांच्या जातमुचलक्यावर विविध अटीशर्तीसह सुटका केली होती. अटीशर्तीनुसार, देशमुखांनी त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा, तपास यंत्रणा आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश आणि मुंबई सोडून जाऊ नये, तपास यंत्रणेला तपासात संपूर्णपणे सहकार्य करावे असे निर्देश दिले होते.
[read_also content=”अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : रमेश कदम यांना जामीन; मात्र सुटका नाही https://www.navarashtra.com/maharashtra/annabhau-sathe-corporation-financial-misappropriation-case-ramesh-kadam-granted-bail-but-there-is-no-escape-nrvb-376648.html”]
त्यानुसार देशमुखांनी विशेष न्यायालयात ॲड. इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत दोन वेगवेगळे अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांपैकी एका अर्जात देशमुख यांनी मुंबईबाहेर जाण्याची परवानगी मागितली असून सामाजिक आणि कौटुंबिक संबंध राखण्यासाठी त्यांना नागपूरला भेट द्यायची आहे आणि दुसऱ्या अर्जात दिल्लीतील त्यांच्या वकिलाचा सल्ला घ्यायचा असल्याचे नमूद करण्यात आले होते त्या अर्जाची दखल गेऊन देशमुखांना नागपूर तसेच नवी दिल्ली येथे जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
याआधीही ६ फेब्रुवारी २०२३ रोजी देशमुख यांना सत्र न्यायालयाने अटीशर्तीसह चार आठवड्यांकरता नागपूरला जाण्यास परवानगी दिली होती.