File Photo : firing
उमरेड : ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या उपसरपंचावर दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात उपसरपंच बचावले. मात्र, किरकोळ जखमी झाले. ही घटना भिवापूर तालुक्यातील मांगरूड येथे मंगळवारी पहाटे घडली. गब्बर देवराव रेवतकर (रा. मांगरूड) असे जखमी उपसरपंचाचे नाव आहे.
रेवतकर हे मांगरूडचे या आधी सरपंच राहिलेले आहेत. घटनेच्या दिवशी मंगळवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास गब्बर हे ‘मॉर्निंग वॉक’ साठी निघाले होते. गावातील एका मंदिराजवळ अज्ञात आरोपी दोन दुचाकींवरून आरोपी आहे. त्यांनी अचानक गब्बर यांच्यावर गोळीबार गेला. गब्बर यांच्या उजव्या भागाच्या ओठाखाली किरकोळ जखम तर एक छर्रा कानाजवळून गेल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती उमरेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. गब्बर यांची उमरेड ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गब्बर रेवतकर यांच्यावर अज्ञात आरोपींनी एकूण 13 वेळा ‘फायरिंग’ केली. त्यामुळे जवळच्या भिंतीला छिद्र पडल्याची माहिती आहे. ही ‘फायरिंग’ छर्रे असलेल्या बंदुकीतून केल्याची परिसरात चर्चा आहे.