मुंबईतील अटल सेतूवर पहिला कार अपघात (Accident At Atal Setu) झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लाल रंगाची कार डिव्हायडरला धडकून कशी उलटली हे दिसत आहे. व्हिडीओ फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की रस्त्यावर वेगात असलेली कार डिव्हायडरला धडकते आणि नंतर उलटली. अटल सेतू हा सहा लेनचा ट्रान्स-हार्बर पूल असून त्याची लांबी २१.८ किमी आहे. त्याचे समुद्र कनेक्शन 16.5 किमी आहे.
[read_also content=”आज अयोध्योत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे पूर्ण वेळापत्रक, ५ तासांत काय काय करणार https://www.navarashtra.com/india/pm-modi-schedule-ayodhya-for-ram-mandir-inaguration-nrps-500416.html”]
अटल सेतूवर झालेल्या पहिल्या अपघातात मारुती कारमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला आणि तीन मुले जखमी झाली असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हा अपघात ज्या प्रकारे झाला, त्यात इतर वाहनेही आदळली असती तर हा अपघात मोठा होऊ शकला असता. मात्र कार दुभाजकाला आदळल्यानंतर पलटी झाली आणि काही अंतरावर ओढल्यानंतर स्वतःहून थांबली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
First Accident on MTHL!
In Ravi Shashtri’s words: Thodi der ke liye….(those who know, know)
Literally pic.twitter.com/UK0TJfL7Kb
— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) January 21, 2024
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर बाईक, ऑटो आणि ट्रॅक्टर चालवण्यास परवानगी नाही. सागरी सेतूवर चारचाकी वाहनांची वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर आहे. पुलावरील प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवरील वेग ताशी 40 किमी इतका मर्यादित असेल. हे मुंबईतील शिवडी येथून उगम पावते आणि रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे संपते. मुंबईच्या दिशेने जाणारी मल्टी-एक्सल अवजड वाहने, ट्रक आणि बस यांना इस्टर्न फ्रीवेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या वाहनांना मुंबई पोर्ट-शिवरी एक्झिट (एक्झिट 1C) मार्गे जावे लागेल. ते ‘गडी अड्डा’ जवळील अटल पथावर येऊ शकतात.