मोर्शी : पाळा( Pala ) येथील महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी धनराज चढोकार याला न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशातून महिलेला पुलावरून पाण्यात फेकल्याची आरोपीने कबुली दिली आहे.
पाळा येथील रहिवासी धनराज चढोकार यांने पत्नी म्हणून वागवणाऱ्या रूपाली मंगेश सराटकर हिला क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली होती. बेशुद्धावस्थेत तिला घरी एकटे टाकून श्री क्षेत्र सालबर्डी (Sri Kshetra Salbardi) येथे एका कार्यक्रमाकरिता निघून गेला. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घरी पोहोचल्यावर ही महिला घरी एका कोपऱ्यात बेशुद्धावस्थेत (unconscious) पडलेली अवस्थेत आढळून आली. धनराजने रूपालीला तिच्या मुलासह मोर्शी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यासाठी आणले. परंतु, ती मृत असल्याचे पाहून तिला उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital) नेण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिला.
आरोपी धनराजने मृतावस्थेत असलेल्या रुपालीला आपल्या मोटर सायकलवर बसविले व मागे तिच्या अल्पवयीन मुलाला बसून मध्यप्रदेश (Madhya Pradesh) हद्दीतील अमराई गावाजवळील पुलावरून (Pulao near Amrai village) पाण्यात फेकून दिले. त्यापूर्वी आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलाला एका पुजाऱ्याजवळ बसून ठेवले होते. या सर्व प्रकाराची कबुली आरोपीने मोर्शी पोलिसांना (Morshi Police) दिली आहे. सतत तीन दिवसापासून मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे स्वतः आपली पोलीस चमूसोबत मृतक रूपालीचा कसून शोध घेत आहे.
काही वर्षांपूर्वी रूपालीचे लग्न झाले असून तिला दोन अपत्य असल्याचे कळते. ती महिला पाळा येथे ८ महिन्यापूर्वी आली होती, त्यानंतर धनराज सोबतच राहत होती. नंतर तिचा अकरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा आईकडे पाळा येथे आला असतांना त्याचा पाचव्या वर्गात सातपुडा विद्यालयात प्रवेश करण्यात आला. त्या अल्पवयीन मुलाला घरावरील टिनावरून टायर काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याने रूपालीसोबत वाद निर्माण झाला व त्याने रागाच्या भरात तिला लाथाभुक्क्यांनी मारहाण (Beating with kicks) केल्याचे समजते.