मुंबईतील बिर्याणी-कलिंगड या प्रकरणाला तपासात वेगवेगळे धागेदोरे सापडले. हे प्रकरणत आता वेगळ्याच वळणावर आलेलं आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरोखरच त्यांचा मृत्यू झाला की यामागे दुसरे काही कारण होते? याबाबत आता ठोस माहिती पोलीसांच्या हाती लागली ती अशी की, अब्दुल्ला डोकाडिया यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू कलिंगड नव्हे, तर विषामुळे झाला. कुटुंबातील चौघांनी जे कलिंगड खाल्लं त्या कलिंगडाची तपासणी केली असता त्यात कोणत्याही प्रकारे जीवघेणे घटक आढळले नाही पण या चौघांच्या शरीरात उंदिर मारण्याच्या औषधाचे घटक सापडले.
Watermelon Case: बिर्याणी, कलिंगड की आणखी काही? एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूमागचं रहस्य उलगडलं!
झिंक फॉस्फाईट त्या चौघांच्या शरिरात गेल्यानं त्यांना उलट्या झाल्या, या नंतर ते फॅमिली डॉक्टरकडे पण कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारलंय? याचा तपास पोलीस करत आहेत.
अब्दुल्ला डोकाडिया हे ४५ वर्षीय स्थानिक व्यावसायिक होते आणि त्यांचे मोबाईल ॲक्सेसरीजचे दुकान होते. ते, त्यांची पत्नी नसरीन (३५), आणि त्यांची मुले झैनब (१३) व आयेशा (१६) यांनी शनिवारी पाच नातेवाईकांसोबत मटण बिर्याणीचे जेवण केले. नातेवाईक निघून गेल्यानंतर, कुटुंबाने रात्री १ वाजण्याच्या सुमारास कलिंगड खाल्ले आणि पहाटे ५ वाजेपर्यंत ते आजारी पडले. त्या सर्वांमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी समान लक्षणे होती, जी विषबाधा झाल्याचं सिद्ध करतात. यानंतर काही तासांतच चौघांचा मृत्यू झाला.






