मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिंदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. आता राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. मात्र, अनेकठिकाणी विरोधाभास दिसून आला. वाशिम, नेरुळमध्ये अजान सुरु असताना हनुमान चालिसेचं पठण करण्यात आले. तर जय श्रीरामच्याही घोषणा देण्यात आली. मुंबईच्या चांदिवली, चारकोपमध्ये मशिदीसमोर चलिसा तर पंढरपूर, मनमाड, कल्याण-डोंबिवली, मुंबईच्या काही भागात भोंग्याविना अजान झाली. मशिद, मंदिरांच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्याविना झाली. मुंबईच्या अनेक भागात मशिदीवरील पहाटेची अजान भोंग्याविना झाली. कल्याण डोंबिवलीतही आज पहाटे अजान भोंग्याविनाच झाली. मनमाडलाही भोंग्याविनाच अजान झाली. मनमाड पोलिसांनी काल शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक घेऊन त्यांना पहाटेची अजाण भोंग्यांवर देऊ नये असं आवाहन केलं होतं.
[read_also content=”राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं दिला निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/rana-couple-granted-bail-mumbai-sessions-court-rules-nrps-275878.html”]
तर, औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. नाशिकमधील सातपूर परिसरात भोंगा लावण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
[read_also content=”राज ठाकरेंकडून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट, चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/old-video-tweet-of-late-shiv-sena-chief-balasaheb-thackeray-from-raj-thackeray-sparks-discussion-275865.html”]