मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणेंच्या (Narayan Rane ) प्रचारासाठी कणकवलीमध्ये प्रचार सभा घेतली. नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या विरुद्ध शिवसेनेविनायक राऊत यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काल राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे कणकवलीमध्ये गेले होते. या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर निशाणा साधला. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले, कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. उद्धव ठाकरे हे देखील कोकणात आहेत. त्यांच्यासोबत आदित्य देखील तिथेच आहे. कोकणातील प्रकल्पना का विरोध केला जात हे देखील जाणून घेतले पाहिजे. चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जायचे. राज ठाकरेंचे प्रिय नरेंद्र मोदी अमी अमित शाह यांनी महाराष्ट्रामध्ये विध्वंस करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे आहेत. ते शाह मोदी यांचे भक्त झाले आहेत. कोकणातील सुपुत्रांचा काल त्यांनी अपमान केला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मोदींच्या मंत्रिमंडळात राहून राणेंनी काय केलं? संजय राऊतांचा सवाल
तुम्हाला बाक बडवणारे हवे आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळातले हवे आहेत, असे राज ठाकरे म्हणाले होते. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राहून नारायण राणेंनी काय दिवे लावले ते त्यांच्या प्रियजनांना सांगावे. बॅरिष्टर नाथ, मधु दंडवते, मधु लिमवते हेही कोकणातून गेले आहेत ते काय फक्त बाक बडवायचे का? स प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. लोचटगिरी करून दहा पक्ष बदलणारे यांना हवेत. मात्र मी सांगू इच्छितो की बाक बडवणाऱ्या १०५ जणांवर मोदींनी कारवाई केली आहे. हे मौनी खासदाराचं समर्थन करताय ही मनसे प्रमुखांची मजबुरी आहे. ते नकली अंधभक्त आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
नरेंद्र मोदी पुलवामावर बोलत होते. औरंगजेबाबाबत अमित शाहांना खूप प्रेम आहे. मोदी व शाह वारंवार औरंगजेबबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. कारण तो गुजरातच्या मातीमधून जन्माला आला आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात पण तेच असत. आणि आमच्या डोक्यात महाराज असतात. मात्र इतिहास पून्हा रचला जाईल. सगळी संपत्ती अदानींची ही मोदी शाहांनी दिली तर ती गरीबात वाटली पाहिजे,असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.