गोंदिया : गोंदियामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यावर मिश्किल भाषेत वक्तव्य केलं आहे. गडकरींनी साखर कारखान्यावर भाष्य केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ‘जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो. हा धंदा खूप बेकार आहे. आता या धंद्यात हात टाकला आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरींनी आज गोंदियात राष्ट्रीय महामार्गाच्या भुमीपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
‘भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून भंडारा जिल्ह्यातील देव्हाडामधील साखर कारखाना माथी मारला आहे, असे नाव न घेता तत्कालीन भाजपचे माजी खासदार आणि सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सहकार नेते स्वर्गीय दादा टिचकुले यांना टोला लगावला आहे. पण मी जे काम हाती घेतो ते पूर्णत्वास नेतो. आम्ही भंडारा जिल्ह्यात देव्हाडा येथे ६०० कोटी रुपये खर्च करून साखर कारखान्याचा विस्तार करतोय. साखर व्यवसाय हा बेकार धंदा असून आता हात टाकला आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेईल’.
[read_also content=”चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/chandrakant-patil-apologizes-for-his-statement-about-supriya-sule-said-nrdm-286188.html”]
दरम्यान यावेळी गडकरींनी रशिया -युक्रेन युद्धाचा भारतावर काय परिणाम झाला यावरही गडकरींना भाष्य केलं. रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील अतिरिक्त गहू आणि तांदळाची निर्यात झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे देशातील गोदामे पूर्ण भरले आहेत. भविष्यात तांदूळ उत्पादकांना भविष्य नाही, असे गडकरी म्हणाले. ‘मात्र रशिया -युक्रेन युद्धाचा फायदा भारताला झाला असून भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि गव्हाची निर्यात झाली, असंही गडकरीही म्हणाले.