सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन (File Photo : Death)
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात महावितरणच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विद्युत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तरुणाच्या जीवावर बेतला आहे. विद्युत खांबावर काम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी तरुणाला वीजपुरवठा सुरू असताना खांबावर काम करण्यासाठी चढण्यास सांगितले. खांबावर काम करत असताना या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
हेदेखील वाचा : Vijay Wadettiwar: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी वडेट्टीवारांच्या अडचणी वाढणार? मंगलप्रभात लोढांनी तक्रार करत केली मोठी मागणी
हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सावळी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत विठ्ठल देमगुंडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सावळी गावात विजेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका वायरमनने गावातीलच झिरो वायरमन असलेला तरुण विठ्ठल देमगुंडे याला विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढवले. यावेळी सदरच्या विद्युत खांबावरील तारेत विद्युत पुरवठा सुरू होता. महावितरणच्या कर्मचाऱ्याने विद्युत खांबावर काम करण्यास सुरूवात करण्यापूर्वी विद्युत पुरवठा बंद करायला सांगायचे विसरला.
यातच खांबावर चढलेला या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. यामुळे विठ्ठल हा जमिनीवर कोसळला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
नातेवाईकांनी मृतदेह नेला महावितरण कार्यालयात
घटनेनंतर वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह हिंगोलीच्या विद्युत कार्यालयात दाखल केला होता. यामुळे महावितरणच्या कार्यालयात गोंधळ उडाला होता. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी हा मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडे पाठवला आहे.
टीव्ही सुरू करताना मुलाचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची शॉक लागल्याची घटना घडली होती. यामध्ये आई-वडिलांच्या गैरहजेरीत घरातील टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का लागून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अड्याळमध्ये घडली होती. सानिध्य विलास मेघराज असे मृताचे नाव आहे. येथील मंडईपेठ येथे कुटुंबासह राहणारा सानिध्य गावातीलच जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेतील चौथीचा विद्यार्थी होता. मात्र, टीव्ही लावण्याच्या प्रयत्नात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Pratap Sarnaik : येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून “स्कूल बसेस” साठी नियमावली लागू करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक