पुणे – ‘ आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल, असे मत पत्रकारांनी विचारलेल्या तांबेच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आम्ही कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती पण ऐनवेळी उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का?
काँग्रेसचे नेते असलेले सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आता भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजपा सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आमचं धोरण बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे. पण कोणताही निर्णय धोरणात्मक घ्यायचा असते.
– अखेरच्या दिवशी निवडणुकीतून माघार
नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसमध्ये असूनही सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यामागे भाजपचीच खेळी असल्याचं म्हटलं जातंय. कारण या निवडणुकीत भाजपने अखेरपर्यंत आपला उमेदवार दिला नाही.