कल्याण : अंबरनाथ मलंगड परिसरातील एका गावात मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आज खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी निघालेल्या स्वागत यात्रेत जीपमध्ये खासदार संजय राऊत ,ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह सुलभा गायकवाड दिसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली. कल्याण पूर्व येथील भाजपा शिवसेनेतील वाद शमला नसल्याच्या अनेक चर्चा देखील रंगू लागल्या होत्या.याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. यावेळी बोलताना सुलभा गायकवाड यांनी मी तिथे प्रचाराला गेले नव्हते,गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती त्या निमित्ताने तिकडे गेले होते.तिकडे असा काही प्रकार होइल असे मला माहित नव्हतं.
मी भाजपासोबत आहे मोदींना पंतप्रधान करायचा आहे. भाजपची जी भूमिका आहे त्यासोबत मी असेल महायुतीचा प्रचार करणार असे सांगितले. तर भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे प्रकार करत असल्याची टीका महाविकास आघाडीवर केली.
मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होता. आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या कार्यक्रमास गेल्या ,स्वागत यात्रेत जीपमध्ये सगळ्यात आधी गेल्या त्यानंतर खासदार संजय राऊत ,वैशाली दरेकर त्या जीपमध्ये आले,अशा पद्धतीने राजकारण करण्याची काही गरज नव्हती. तो कार्यक्रम गावकीचा होता धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. भाजप कार्यकर्ते व आमदार गणपत गायकवाड समर्थक हे त्यांच्या भूमिकेसोबत आहेत. गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यादेखील भाजपासोबतच आहेत. त्यांचा महाविकास आघाडीला कोणताही पाठिंबा नाही. त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या सोबत आहेत .सुलभा गायकवाड महायुतीच काम करणार असल्याचे सांगितले .
गोरपे गावात गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती, त्या निमित्ताने तिथे गेले होते कोणाच्या प्रचारासाठी आम्ही गेलो नव्हतो असा हे सर्व तिथे होईल मला माहित नव्हतं.. मी भाजपसोबत आहे ..मोदींना पंतप्रधान करायचा आहे. भाजपची जी भूमिका आहे त्यासोबत मी आहे ,महायुतीचा प्रचार करणार असं स्पष्टीकरण भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलंय . त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उफाळलेल्या भाजपा शिवसेना वादावर स्वतः सुलभा गायकवाड यांनीच पडदा टाकला आहे.