मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) 39 आमदारांनी बंड करत शिंदे फडणवीस सरकारची (Shinde fadnvis government) स्थापना केली. मुख्यमंत्री म्हणून शिंदे गटाचे एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) उपमुख्यमंत्री झाले. यानंतर बऱ्याच कालावधीनंतर भाजप व शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाची स्थापन झाली. पण यावेळी शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण अनेकांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराजीचा सूर होता.
[read_also content=”मुंबईत युवासेनेच्या निषेध स्वाक्षरी मोहिमेला तरुणांचा उदंड प्रतिसाद https://www.navarashtra.com/maharashtra/yuvasena-protest-campaign-against-shinde-fadnvis-government-326367.html”]
दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं शिरसाठ नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आपण नाराज असल्याचे शिरसाठ यांनी फेटाळून लावले असून, उगाच नाराजीचा अफवा पसरवू नका, जे कोणी मी माझ्याविरोधात नाराज आहे म्हणून अफवा पसरवाताहेत त्यांच्याविरोधात मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.