संग्रहित फोटो
राजगुरुनगर : मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपोषण देखील सुरु केले होते. महिनाभरात आरक्षणावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले होते. पण आता पुन्हा त्यांनी इशारा दिला आहे. ’24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळाले नाहीतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात होईल’ असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
पुण्यातील राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटील यांची जाहीरसभा होत आहे. तत्पूर्वी त्यांनी शिवनेरीवर शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली. ‘येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यथा पुन्हा आंदोलनाला सुरुवात होईल.
जरांगे पाटील यांची आज सरकारला कायदा पारित करण्यासाठी पुरावा हवा होता. त्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता. पुरावे सापडले नसते तर आम्ही आणखी काही दिवसांचा वेळ दिला असता. पण आता पुरावे सापडले असून, सरकारने भावनिक न होता कायदा बनवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.