महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आगामी काळात पावसाची शक्यता एक महत्त्वपूर्ण आव्हान ठरण्याची शक्यता आहे. कारण भारतीय हवामान विभागाने नुकताच दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीन विभागांत पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन आले आहे.
आज दिवाळी पाडव्याला राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
सध्या राज्यातील वातावरण अत्यंत अस्थिर आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी कोरडे हवामान अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना चिंतेचा सामना करावा लागत आहे. रब्बीच्या हंगामात पावसाचा हा प्रकार शेतकऱ्यांसाठी अनिश्चितता निर्माण करणारा आहे. याचदरम्यान हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. अलर्टमध्ये मध्य महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्हे आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : दिवाळीत फटाक्यांमुळे वातावरण होते प्रदूषित, पुढील काही दिवस द्या ‘या’ गोष्टींकडे लक्ष
दरम्यान मान्सूननंतरच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान उकाडा आहे. केवळ मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली असून आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेऊन पावसाची पद्धत लक्षात घेऊन शेतीच्या कामाचे नियोजन करावे. खर तर, सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.
अनेक ठिकाणी गहू, गवत, मका आदींची मळणी पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी मळणी बाकी आहे. अशा स्थितीत दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडल्यास आणि रब्बी हंगामात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे.
या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा देखील होऊ शकतो. विशेषता कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर राहील असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा : ऐन दिवाळीत चोरट्यांचा सराफी पेढीवर डल्ला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे दागिने केले लंपास