रेशनच्या नावावर निकृष्ट धान्याचा पुरवठा! धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी
अमरावती जिल्ह्यातील काही रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र अनेकांना खराब दर्जाचे तांदूळ व गहू मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. साधारणतः जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) गुणवत्ता तपासणीनंतरच धान्य पुरवठा केला जातो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे आणि खाण्यायोग्य धान्यच वितरित होणे अपेक्षित असते. मात्र मोठ्या प्रमाणावर धान्य साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान काही पोत्यांमध्ये खराब धान्य येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत दुकानदारांना ते धान्य परत करण्याची मुभाही असते. मात्र, जिल्ह्यातील काही भागांतील रेशन दुकानांमधून वितरित केलेल्या तांदळात दगड, कचरा तसेच कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
काही ठिकाणी वितरित करण्यात येणाऱ्या गव्हाचाही दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. या निकृष्ट धान्यामुळे ते वापरणे कठीण होत असून अनेकांना ते धान्य न वापरण्याची वेळ येत असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली.याबाबत संबंधित रेशन दुकान चालकांना विचारणा केली असता, गोदामातून जसे धान्य येते तसेच त्याचे वितरण केले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांनी चांगल्या दर्जाचे धान्य देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाने सातत्याने रेशन दुकानांची तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना योग्य पद्धतीने मिळावा यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने संबंधित रेशन दुकानांची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अकोल्यात तापमानाचा पारा चढलेलाच; आता उष्मालाटेसह अवकाळीची शक्यता
काही रेशन दुकानांतून वितरित करण्यात आलेल्या तांदळामध्ये दगड, कचरा तसेच कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार लाभाथ्यर्थ्यांनी केली आहे. त्यामुळे ते धान्य स्वच्छ करून वापरणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तांदळासोबतच गव्हाच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी पुढे आल्या आहेत. वितरित करण्यात येणारा गहू खराब आणि खाण्यायोग्य नसल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले.धान्य दुकानदारांनी खराब धान्य वितरित करू नये. ज्या केले जाऊ शकते. अशा सुचना जिल्ह्यातील सर्वच धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत, असे मत निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अमरावती यांनी मांडले आहे.






