मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. (MVA Meeting) ही बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान, या बैठकीत हिवाळी अधिवेशनातील रणनिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली, त्यांच्याविरोधात कोणती भूमिका घ्यायची यावर बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची शिवसेना अशी तिन्ही पक्षातील नेते हजर होते. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप (Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat, Ashok Chavan, Leader of Opposition Ambadas Danve, Bhai Jagtap) आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यपाल हटाव तसेच ज्यांनी-ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यांच्या विरोधात हा विराट मोर्चा काढणार आहे, असं अजित विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
[read_also content=”राज्यपाल हटावसाठी महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा https://www.navarashtra.com/maharashtra/mahavikas-aghadi-grand-morch-on-december-seventeen-for-the-suspend-the-governor-351234.html”]
दरम्यान, 17 तारखेला मविआ महामोर्चा काढणार आहे, सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार आहे, असं बैठकीत तिन्ही पक्षाचे एकमत झाले असल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, राज्यात मविआचे अडीच वर्ष सरकार होते, पण राज्यातील एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आलेले प्रकल्प गुजरातला जाताहेत. गुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय का, अशी टिका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांनी केली. शिंदे फडणवीस सरकार म्हणते दुसरे उद्योग आणू अरे जे आलेले उद्योग बाहेर घालवले आणि दुसरे उद्योग कोणता आणता? सरकारचे बाकीचे नको ते उद्योग चालले आहेत. अशी टीका अजित पवारांनी केली आहे.