भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर कल्याण डाेंबिवलीतील राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणाला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. डोंबिवलीतील केईएमसी गॅंग, शेलार गॅंग यांची एकेकाळी दहशत होती. ही गॅंग कालातंराने संपुष्ठात आली. आता ज्याप्रकारे महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात वाद सुरु झाला. त्यामुळे आता कल्याण पूर्वेत गेल्या काही वर्षात अनेक गॅंगवॉरच्या घटना घडल्या आहे. धक्कादायक म्हणचे यामध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्हे करण्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर लोक मिम्स तयार करीत आहेत.
डोंबिवलीत दयावान सरकारचा आधारस्तंभ आणि त्यावर कुख्यात गुन्हेगार असलेल्या भाई लोकांचा फोटो वाढदिवचा हा बॅनर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात कल्याण डोंबिवली गुन्हेगारीकडे वळतोय का अशी भिती सर्व सामान्यांमध्ये असताना डोंबिवलीत बॅनरबाजी करुन अशा प्रकारचे लोक नेमके काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत? त्यांची काय मानसिकता आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
समर्थकांकडून त्यांचा नेता किती मोठा झाला आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सगळे सुरु असताना डाेंबिवलीत वाढदिवसाचा एक बॅनर झळकला आहे. या बॅनरवर सचिनभाई खुस्पे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दयावान सरकार महाराष्ट्र सरकार, दयावान सरकारचे आधारस्तंभ असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर कुख्यात गुंड अश्विन नाईक, कुख्यात गुन्हेगार असलेला माजी आमदार पप्पू कलानी, जैस्वाल, देशमुख अप्पा यांचे फोटो आहेत. या अशा प्रकारचे बॅनर लाऊन गुन्हेगारीवर सरकार दयावान आहे का असा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.