जामखेडच्या रस्त्याची दुरवस्था
अहिल्यानगर/वसंत सानप: जामखेड तालुक्यातून जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या शिर्डी- हैद्राबाद महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जामखेड तालुक्यातील खर्ड्यापर्यंतचा रस्ता दुरावस्थेच्या विळख्यात सापडला असून ‘ मृत्यूचा सापळा’ बनला आहे. अतिवृष्टी व गेली वर्षभरापासून वेळी अवेळी झालेल्या पावसामुळे रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग अनेक ठिकाणी उखडला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईड पट्या उखडून चर पडले आहेत मुख्य रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाची रुंदी कमी जागोजाग घडलेल्या खेड्यांमुळे प्रवाशांचे कोरड मोडले आहे. तर चालकांना येथून प्रवास करताना जीव घेणी कसरत करावी लागत आहे. ‘संगमेश्वर पुला’ च्या दरम्यान तर रस्ता धोकेदायक बनलेला आहे. तसेच गोलेकर लावणात पांढरेवाडी फाट्याजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दररोज अपघात होताहेत.
खर्डा जामखेड रस्यादरम्यान केवळ साडेतीन किलोमीटर अंतराचा रस्ता चांगला असून उर्वरित साडेसहा किलोमीटरचा रस्ता अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने खराब झालेला आहे. सदरच्या रस्त्यादरम्यान खड्डे भरण्याचे कामाचे टेंडर खुले झाले असून याकरिता 67 लाख रुपये रक्कम मंजूर आहे व हे काम सागर कार्बो लिमिटेड या कंपनीला मिळालेले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे – शशिकांत सुतार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामखेड
अहिल्यानगर शहरात दोन वेळा होणार स्वच्छता! स्वतः आमदार संग्राम जगताप स्वच्छतेसाठी उतरेल रस्त्यावर
तालुक्यासाठी महत्वाचा मार्ग असूनही झाले दुर्लक्ष
खर्डा आणि जामखेड ही तालुक्यातील महत्वाची गाव आहेत. या दोन्ही गावांच्या भोवती संपूर्ण तालुका केंद्रित झालेला आहे. प्रशासकीय व सामाजिक सुविधांसाठी या दोन्ही गावांर तालुक्यातील ग्रामस्थ आधारभूत आहेत. या सर्वांना प्रवासासाठी खर्डा- जामखेड हा प्रमुख मार्ग आहे, या मार्गावर खर्डा किल्ला आहे, त्यामुळे या रस्त्याचे पर्यटन दृष्टीने महत्त्व वाढले आहे. तसेच श्री. क्षेत्र सिताराम गड, श्री क्षेत्र गीतेबाबा समाधीस्थळ आणि बारा प्रतिज्योर्तिलिंग मंदीर याच भागात आहेत, त्यामुळे पंचक्रोशीतून व शेजारच्या तालुक्यातील भाविक भक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. तसेच स्थानिक, शेतकरी, गावकरी इत्यादीच्या व्यवसाय व व्यवहारासाठी मार्गाचा उपयोग होतो.
प्रवासाला दुप्पटचा वेळ जात आहे खर्ची
जामखेड – खर्डा भूम – पार्टी – राज्य मार्ग लेखाशिर्ष -५७ अंतर्गत जामखेड तालुक्यात रस्ता हद्द २२ किलोमीटर आहे. हा मार्ग मुख्यतः जिल्हा मुख्यालय किंवा जिल्ह्यांमधील ग्रामीण भागाशी जोडणारा रस्ता आहे. या मार्गासाठी पुरवलेल्या योजनांमध्ये “विस्तार व सुधारणा” ही कामं आहेत. या रस्त्यावर प्रवासाचा कालावधी अंदाजे २५ ते ३० मिनिटे असा आहेत मात्र प्रत्यक्षात हा प्रवास करण्यासाठी दुप्पटचा वेळ खर्ची घालावा लागतो शिवाय प्रवास सुरक्षित होईलच असे नाही.
अन्य राज्य व जिल्ह्यासाठी महत्वाचा मार्ग नादुरूस्त
नाशिक, नगर व बीड जिल्ह्यातील भक्तगण श्री क्षेत्र तुळजापूरला आंबा मातेच्या दर्शनाकरिता उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील भवकभाण या रस्त्यावरुन श्री क्षेत्र शिर्डीला येतात; जामखेड तालुक्यातून जाणाऱ्यां रस्त्याच्या दुरावस्थेचा भाविक भक्तांना मोठा त्रास सोसावा लागतो. ही दुरावस्था हटवावी याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभागाने खड्डे बुजविण्याची उपाययोजना हाती घेतली आहे: प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली मात्र कायमस्वरूपी अडचण सुटावी याकरिता नव्याने संपूर्ण रस्त्याचे काम करण्याची आवश्यकता आहे.






