बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत असताना बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मधील दोन शिक्षकांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
विनोद खटके व मनोज कुंभार अशी या दोन शिक्षकांची नावे आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या संस्थेत ते कार्यरत आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात .यावर्षी वाढदिवसादिवशी म्हणजेच १२ डिसेंबर या तारखेलाच शिखरावर जाऊन त्यांनी फलकाद्वारे पवार यांना शुभेच्छा देण्याची योजना आखली व त्यानुसार त्यांनी ती पूर्णत्वास नेली. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचाही वाढदिवस असतो, या दोघांनाही फलकाद्वारे या दोघांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या.
शरद पवार हे महाराष्ट्रासाठी सह्याद्रीसारखे कणखर नेतृत्व आहे. त्यांचे महाराष्ट्र व देशासाठी अमूल्य योगदान आहे त्यामुळे अशा सर्वोच्च नेतृत्वाला सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावरून शुभेच्छा देण्याचा आनंद वेगळा असल्याचे मत विनोद खटके व मनोज कुंभार यांनी व्यक्त केले.






