कल्याण : संपूर्ण महाराष्ट्रात कमी मतदान होते असा शिक्का आता कल्याण लोकसभा मतदार संघावर बसलेला आहे. मात्र सोमवारी पार पडलेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीच्या मतदानात 10 लाख 43 हजार 610 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्के वारी 50.12 इतकी झाली आहे. सर्वात जास्त मतदान कल्याण पूर्व विधान सभा क्षेत्रातून 52.19 टक्के झाले तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून 47.06 टक्के इतके झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.
[read_also content=”पराभव होताच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लंडनला पळणार – आमदार नितेश राणे https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-and-aditya-thackeray-will-flee-to-london-as-soon-as-they-are-defeated-mla-nitesh-rane-536205.html”]
विशेष म्हणजे वर्ष 2019 सालच्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत 47.01 टक्के मतदान झाले होते. सोमवारी पार पडलेल्या 2024 च्या निवडणुकीतील मतदानची टक्के वारी 50.12 इतकी झाल्याने मतदानाच्या टक्केवरीत 3.11 टक्काने वाढ झाली आहे. शासनाने आणि पालिका प्रशासनाने मतदान टक्केवारीसाठी जनजागृतीचे विविध उपक्रम राबविलेल्या यश आल्याचे दिसून आले आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघातील 2009 साली 34 टक्के, 2014 मध्ये 40 टक्के आणि 2019 मध्ये या मतदार संघातील 47.01 टक्के मतदारांनीच मतदान केले. सोमवारी 20 मे 2024 रोजी पार पडलेल्या मतदानात कल्याण लोकसभेतील 10 लाख 43 हजार 610 लोकांनी मतदान केल्याने मतदानाची आकडेवारी 50.12 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे 2019 सालाच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 3.11 टक्के इतकीच वाढ झाली आहे.
[read_also content=”कोकण विभागातील रायगड जिल्ह्याने बारावीच्या निकालात मारली बाजी https://www.navarashtra.com/maharashtra/in-the-konkan-division-raigad-district-won-the-12th-result-536243.html”]
कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा, मुंब्रा या सहा विधानसभा क्षेत्रातील मिळून एकूण 20 लाख 82 हजार 221 मतदारांची संख्या आहे. सोमवारी झालेल्या मतदानात अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील एकूण 3 लाख 53 हजार 554 मतदारांपैकी 1 लाख 66 हजार 407 मतदारांनी 47.06 टक्के मतदान झाले आहे. तर उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील एकूण 2 लाख 57 हजार 367 मतदारांपैकी 1 लाख 31 हजार 505 मतदारांनी 51.09 टक्के मतदान केला आहे. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील एकूण 2 लाख 99 हजार 380 मतदारांपैकी 1 लाख 56 हजार 235 मतदारांनी 52.19 टक्के मतदान झाले आहे. डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील एकूण 2 लाख 75 हजार 110 मतदारांपैकी 1 लाख 42 हजार 142 मतदारांनी 51.66 टक्के मतदान झाले.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील एकूण 4 लाख 53 हजार 149 मतदारांपैकी 2 लाख 31 हजार 162 मतदारांनी केले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात 51.01 टक्के मतदान झाले. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील एकूण 4 लाख 43 हजार 661 मतदारांपैकी 2 लाख 16 हजार 159 मतदारांनी 48.72 टक्के मतदान केले.