ग्रामपंचायत मतदारसंघात दोन्ही पॅनेलला समान संधी मिळाली. याच मतदारसंघात मनीष देशमुख यांच्या निवडणुकीच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात होणार असल्याने सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंगची चर्चा होती. उत्तर सोलापूरमध्ये बळीराम साठे आणि जितेंद्र साठे यांनी नान्नज केंद्रावर दिवसभर ठिय्या मांडला होता. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड हे गणेश वानकर यांच्यासाठी दिवसभर उत्तर सोलापूरमध्ये थांबले होते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, या मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी स्वतःसाठी मत मागितली आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सहकार संस्था सर्वसाधारण गट
दिलीप माने – 1361
सुरेश हसापुरे – 1355
राजशेखर शिवदारे – 1366
श्रीशैल नरोळे – 1244
उदय पाटील – 1283
प्रथमेश पाटील – 1271
नागप्पा बनसोडे -1280
सहकार संस्था महिला राखीव गट
इंदुमती अलगोंडा – 1327
अनिता विभुते – 1288
सहकार संस्था इतर मागास वर्ग
अविनाश मार्तंडे -1345
सहकार संस्था विमुक्त जाती-भटक्या जमाती
सुभाष पाटोळे -1243
ग्रामपंचायत मतदारसंघ (देशमुख पॅनेल)
मनीष देशमुख -636
रामप्पा चिवडशेट्टी – 615
ग्रामपंचायत मतदारसंघ राखीव
अतुल गायकवाड -589