कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बांधण्यात येत असलेल्या पोशीर धरणाला विरोध करण्यासाठी बोरगाव धरण विरोधी समितीच्या वतीने बोरगाव,उंबरखांड,भवानीपाडा,बोन्डेशेत,पेंढरी, चेवने भोपळेवाडी, झुगरेवाडी, ऐनाचीवाडी, चाफेवाडी,खांडसपरिसर, चई,कोतवालवाडी,ओलमन,सुरुंग,तेलंगवाडी,गावंड वाडी येथीलस हेटकाऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.समितीचे प्रमुख तानाजी चौधरी,सचिव भरत डोंगरे,तसेच अशोक पाटील,लक्ष्मण पोसाटे,राजेंद्र डोंगरे,ललित धस,प्रभाकर खडेकर,नंदू खडेकर ,नितीन पाटील,सुधीर शेळवले,समीर खडेकर,यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड कर्जत रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून हा मोर्चा कर्जत तहसील कार्यालयावर पोहचला.
शिलार धरण प्रकल्पग्रस्त समिती चे वतीने निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व भाजप मंडळ अध्यक्ष आणि बांधीत होणारे शेतकरी दिनेश रसाळ.तसेच काशिनाथ रसाळ,माधव मिणमिने,अशोक आसवले,वसंत रसाळ,राजेंद्र भगत,काशिनाथ निरगुडे,रामदास शिंगटे,संतोष कदम,वसंत केवारी यांच्या नेतृत्वाखाली निघाला.या मोर्चात शिलार धरणामुळे बाधित होतील अशा गावातील शेतकरी सहभागी झाले होते.त्यात धोत्रे ,धोत्रेवाडी,शिलार,किकवी. पिंगलस,खांदन,शिलारवाडी,आनंदवाडी,मोगरज,भक्ताची वाडी,आंबिवली,शिंगधोळ,धामणी,जांभूळवाडी,चौधरी वाडी आदी गाव आणि वाडीमधील शेतकरी सहभागी झाले होते.छत्रपती संभाजी महाराज चौक येथून निघालेला हा मोर्चा आमराई मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रशासकीय भवन येथे पोहचला.
प्रशासकीय भवन येथे मोर्चाचे वतीने प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी तहसीलदार डॉ धनंजय जाधव,पोलीस अधिकारी कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील,नेरळ पोलीस थानायचे प्रभारी अधिकारी राहुल वारोटे आदी उपस्थित होते. तेथे शिलार आणि पोशीर धरणाला विरोध करणारे आणि मोर्चाला पाठिंबा देणारे विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांची निवेदने प्रांत अधिकारी यांनी स्वीकारली. पोशीर धरणाच्या वतीने प्रकल्प ग्रस्त समितीचे अध्यक्ष तानाजी चौधरी तर शिलार धरणाच्या वतीने दिनेश रसाळ यांनी आपला या धरणाला का विरोध आहे यांचे भूमिका मांडली.यावेळी प्रांत अधिकारी यांनी सर्व भूमिका समजून घेत पुढील आठवड्यात जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियानात यांच्यासोबत याच ठिकाणी दोन्ही धरणाच्या समिती सोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.
मोर्चाला पाठिंबा देणारे
शिवक्रांती संघटना,आगरी समाज संघटना,किसान क्रांती संघटनामकर्जत बचाव समिती,कर्जत वीज विरोधी समिती तसेच राजकीय पक्ष यात भाजप,शिवसेना ठाकरे गट,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,आरपीआय आठवले गट,मनसे
मागणी
शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना सुरु असलेले धरणाचे काम थांबवावे आणि आधी शासनाने पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात यावी अशी मागणी शिलार आणि पोशीर धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी केलीय आहे.
इशारा
धरण बांधण्यासाठी शासन अशीच भूमिका घेणार असेल तर पुढील बैठकीनंतर शासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल. त्याचवेळी वेळ आली तरार राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
पोलिसांकडून पाणी
सध्याची उन्हाची स्थिती लक्षात घेऊन कर्जत आणि नेरळ पोलीस यांच्या माध्यमातून प्रशासकीय भवनाच्या बाहेर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.स्वतः पोलीस सर्व आंदोलकांना पाण्याच्या बाटल्या वाटप करीत होते.






